जलयुक्त योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल,-रोहित पवार

0
25

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतील गैरकारभाराबाबत ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर आता या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे.जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल,” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here