आम्हाला नवरात्रोत्सवात मंदिरे खुली करण्याची परवानगी द्या.- वारकरी महामंडळातर्फे मागणी
किर्तन आणि प्रवचनातून आम्ही शासनाचा कोरोना संदर्भातील जनजागृती संदेश लोकांपर्यंत पोहचवू. आम्हाला नवरात्रोत्सवात मंदिरे खुली करण्याची परवानगी द्या. अशी मागणी वारकरी महामंडळातर्फे शासनाला करण्यात आली. येथील प्रांताधिकारी कार्यालयात यासंदर्भातील निवेदन देण्यात आले.
यासंदर्भात वारकरी महामंडळाचे कोकण विभागीय अध्यक्ष कोकरे महाराज म्हणाले, १७ ऑक्टोबरपासून नवरात्र महोत्सव सुरू होत आहे. आम्ही नवरात्र काळात सोशल अंतर ठेवून, मास्क वापरून तसेच शासनाच्या नियमावलीचे पालन करून नवरात्रोत्सव साजरा करण्यास तयार आहोत. जिल्हाधिकार्यांनी आम्हाला चर्चेला बोलवावे. चर्चेतून अनेक गैरसमज दूर करता येतील
www.konkantoday.com