एसटी प्रमाणेच राज्यातील खासगी वाहतुकदारांना सुद्धा १००टक्के प्रवासाची परवानगी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या अनेक सेवा आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत सुरू केल्या जात आहे. यापूर्वी खासगी वाहतुकदारांना एसटी प्रमाणेच ५० टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी होती. त्यानंतर आता, एसटी प्रमाणेच राज्यातील खासगी वाहतुकदारांना सुद्धा १००टक्के प्रवासाची परवानगी देण्यात आली असून, प्रवासी वाहतुकीदरम्यान कोविड 19 च्या नियमांचे तंतोतंत पालन सुद्धा करावे लागणार आहे.यासंदर्भात परिवहन आयुक्तांनी राज्य शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर आता खासगी वाहतुकीलाही १०० टक्के प्रवासी वाहतूक करता येणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.
www.konkantoday.com