उमेद चे खासगीकरण करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम करणारी उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हि चळवळ मोडीत करून त्याचे खासगीकरण करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरवात सन २०१३ पासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इंटेन्सिव्ह पद्धतीने राबविण्यात आली आहे . सदर अभियानाअंतर्गत अभियानाच्या मनुष्यबळ संसाधन धोरणाच्या आधारे कंत्राटी अधिकारी व कर्मचारी याची नियुक्ती स्पर्धात्मक परीक्षा घेऊन भरती करण्यात आली आहे . त्याप्रमाणे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण ८९ अधिकारी व कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत .उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा रत्नागिरी अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना अभियानातून कमी करू नये अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे
www.konkantoday.com