
तुतारी एक्सप्रेसला प्रवाशांचा कमी प्रतिसाद, नुकसान टाळण्यासाठी मडगाव पर्यंत नेण्याचा प्रस्ताव
बेलापूर: लॉकडाऊन लागू झाल्यानंतर २१ मार्चपासून सहा महिने बंद असलेली कोकण रेल्वे मार्गावर दादर-सावंतवाडी दरम्यान धावणारी तुतारी एक्स्प्रेस विशेष गाडी म्हणून सुरु करण्यात आली असली तरी तिला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने दररोज लाखो रुपयांचा तोटा सहन करीत धावत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी ही गाडी तूर्त मडगावपर्यंत नेण्याचा प्रस्ताव कोकण रेल्वेने मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवला असल्याची मिळाली आहे. तुतारी एक्सप्रेस सावंतवाडी पर्यंत धावत आहे सध्या कोरोनामुळे रेल्वेने प्रवास करायचा असेल तर आधी बुकिंग करावे लागत आहे करंट बुकिंग बंद असल्याने ऐनवेळी प्रवास करता येत नाही याशिवाय प्रवास करण्याआधी एक तास आधी हजर राहावे लागते त्यामुळेही प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाला आहे याउलट कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा त्यामानाने चांगला प्रतिसाद आहे
www.konkantoday.com