
गांजा व नशेच्या गोळ्या बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
अमली पदार्थ गांजा व
नशा येणाऱ्या गोळ्या व सिरप बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी राहीद मुकरी राहणार उद्यमनगर याला अटक केली आहे तर यातील आणखी एक आरोपी अबू याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यातील राहीद हा शिवखोल घाटी मेस्त्री स्कूल जवळ आपल्या हिरो मोटरसायकल वरून आला असता त्याच्याकडे अमली पदार्थ गांजा व नशा येणाऱ्या गोळ्या व सिरप आढळून आले हे पदार्थ त्याने मुंबई गोवंडी येथून अबू नावाच्या इसमाकडून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले पोलिसाने त्याच्याकडून २६ हजाराचा माल जप्त केला या प्रकरणात राहीद याला अटक करण्यात आली आहे
www.konkantoday.com