रत्नागिरी बसस्थानकाचे नुतनीकरणाच्या निमित्ताने जनतेच्या जीवाशी खेळ थांबवा-समविचारी मंचने दिला आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी बसस्थानकाचे काम धीम्या गतीने सुरुआहे.जागोजागी चर खोदून अस्ताव्यस्थ माती पसरली आहे.खड्डे खोदून जनतेच्या जीविताशी खेळ सुरु आहे हे काम त्वरित हाती घ्या अन्यथा जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर निवेदन मुख्यमंत्री पालकमंत्री यांना ई- मेल द्वारे देण्यात आले.सदर निवेदनात गेले वर्षभर जुन्या बसस्थानकाचे काम रेंगाळत सुरु असून मुळ ठेकेदार आणि सहठेकेदार गायब आहेत.निविदा प्रक्रियेला काम पूर्ण करण्याचा काही कालावधी आहे की नाही ? असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला आहे.
हे काम केवळ महिनाभर झाले.बाकी प्रगती शुन्य आहे.पालकमंत्री परिवहन खाते बघतात तरीही हे लाजीरवाणे प्रदर्शन सुरु आहे.
हे काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा समविचारीचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,महासचिव श्रीनिवास दळवी,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,युवा अध्यक्ष निलेश आखाडे,तालुकाध्यक्ष डॉ सुजय लेले,महिला तालुकाध्यक्ष साधना भावे,आदींनी दिला आहे.
www.konkantoday.com