आंबोली राज्यमार्गावरील हिरण्याकेशी नदीवरील पुलाच्या कठड्याला आयशर ट्रकजोरदार धडक देत सुमारे १५ फुट खाली नदीत कोसळला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हिरण्यकेशीफाटा येथील राज्यमार्गावरील हिरण्याकेशी नदीवरील पुलाच्या कठड्याला आयशर ट्रक ( एम एच ०९ सी ए २८९८ ) जोरदार धडक देत सुमारे १५ फुट खाली नदीत कोसळला. ही घटना शुक्रवारी रात्री ११.३० अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.अपघातात आयशर ट्रक चालक सुशांत ( जि. कोल्हापूर ) सुदैवाने बचवला आहे. तर आपल्या सोबत अजुन एक क्लिनर सुधीर संकेश्वरी ( जि. कोल्हापूर ) नामक व्यक्ती बेपत्ता असल्याचे चालकाचे म्हणणे असून त्याचा शोधकार्य घटनास्थळी चालू आहे.
www.konkantoday.com