रत्नागिरी जिल्ह्यात आता मास्क शिवाय फिरणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई होणार-ना.उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव रोखायचा असेल तर मास्क वापरणे ,सुरक्षित अंतर ठेवणे, हाताची स्वच्छता करणे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत.जिल्ह्यात अनेक भागात नागरिक मास्क वापरत नसल्याचे आढळून आले आहे यामुळे आता मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले असल्याची माहिती नामदार उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.यापुढे सार्वजनिक ठिकाणी ,सरकारी कार्यालयात व अन्य गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.मास्क न वापरणाऱ्यांवर तसेच मास्क चेहऱ्यावर नसल्यास दंडाची कारवाई म्हणून पाचशे रुपये दंड होणार आहेच परंतु जो कोणी परत परत मास्क न वापरण्याचा गुन्हा करीत असेल तर त्याच्यावर आता पोलीसांनी गुन्हे दाखल करावेत असे आदेशही आपण दिले आहेत असे त्यांनी सांगितले
.यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्या विरुद्ध पोलीस यंत्रणा कडक कारवाई करणार असल्याने जिल्ह्यातील नागरिक मास्क न घालता बाहेर पडल्यास त्यांच्यावर दंडाबरोबरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com