धनगर समाजाच्या घटनादत्त अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीबाबत कोकणील धनगर समाज आक्रमक, गेली ७० वर्षे धनगर समाजाची घोर फसवणूक
धनगर समाजाच्या घटनादत्त अधिकार असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी आजवर अनेकदा आश्वासन दिली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या ३४२ व्या कलमानुसार दिलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण यादीत (३६) नंबरला स्पष्टपणे समावेश केलेले असताना केवळ धनगड हा अस्तित्वहीन समाज पुढे करून धनगर समाजावर अन्याय केला जात आहे.
आपण या पूर्वी धनगर समाजाच्या या मागणीची पूर्तता करण्याचे अनेकदा आश्वासने दिली आहेत, धनगर समाजाच्या पुढीलप्रमाणे मागण्या आहेत
- १) धनगर समाजाच्या घटनादत्त अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करून सर्टिफिकेट द्यावी २) मागील सरकारच्या काळात एक हजार कोटी जमातीसाठी तात्काळ लागू कराव्यात ३) धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दाखला मिळेपर्यंत नोकर भरती व स्थगिती आणावी. ४) कोकणातील धनगरवाड्यांना (डोंगराळ भाग) यांना तांडा वस्ती योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी मंगेश बाबाजी गोरे, प्रशांत कोंडीराम आखाडे, सकल धनगर समाज, ता. खेड, जि. रत्नागिरी (महा.) यांनी केली धनगर समाजाच्या मागण्या बाबत निवडून गेलेल्या विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे
konkantoday.com