सिव्हिलच्या स्क्रिनिंग ओपीडी विभागात कर्मचारी संख्या वाढवाः समविचारी मंचची शासनाकडे मागणी
रत्नागिरीः कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.संशयास्पद लक्षणे दिसू लागताच लोक स्वँबटेस्टसाठी जिल्हा रुग्णालयात येत आहेत.तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येच्या मानाने या विभागातील कर्मचारी संख्या तुटपुंजी असल्याने नागरिकांना तिष्ठत रहावे लागत आहे म्हणून या विभागात त्वरित कर्मचारी संख्या वाढवावी अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने आरोग्य मंत्री व इतर जबाबदार यंत्रणेला ई- मेल माध्यमातून निवेदनाआधारे करण्यात आली आहे.
संशयित नागरिक गर्दीने या विभागात येत आहेत.त्या मानाने या विभागात कर्मचारी संख्या अपूर्ण आहे.रात्रंदिवस हा कर्मचारी काम करतो तेव्हा कामाची विभागणी,कमी वेळात कामाचा निपटारा होण्यासाठी कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी समविचारीचे बाबासाहेब ढोल्ये,प्रदेश सरचिटणीस संजय पुनसकर,महाचिटणीस श्रीनिवास दळवी,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,युवा प्रमुख निलेश आखाडे आदींनी केली आहे.
www.konkantoday.com