निवृत्त शिक्षिका सौ. तेजा मुळ्ये यांनी सुरू केले समुपदेशन केंद्र

0
37

रत्नागिरी-सध्याचा कोरोना काळ व वाढती महागाई, विभक्त कुटुंब, विसरभोळेपणाचा ज्येष्ठांना वाढता त्रास आणि मानसिकता सुधारण्यासाठी येथील निवृत्त शिक्षिका सौ. तेजा मुळ्ये यांनी गरजूंचे समुपदेशन करण्यास सुरवात केली आहे. ‘सोबत’ या नावाने त्यांनी हे समुपदेशन सुरू केले आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेतून शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या सौ. मुळ्ये सध्या दररोज अ‍ॅपेक्स हॉस्पीटल येथे तीन तास कोविड रुग्णांशी संवाद साधतात. त्यांचे मनोबल, आत्मविश्‍वास वाढवतात. सायंकाळच्या वेळी गरजूंचे समुपदेशन करण्याचे काम त्या करू लागल्या आहेत. शाळेतील अनुभवामुळे दिव्यांग व्यक्तीला घरात कसे सांभाळावे, तसेच विस्मृती होणार्‍या व्यक्तीला समजून घेऊन कुटुंबात सांभाळण्यासाठी काय करावे याबाबत त्या समुपदेशन करणार आहेत.
कोरोना येऊन सात महिन्यांत अनेक जण तणावाखाली वावरत आहेत. शाळा बंद असल्याने मुलांच्या वर्तन समस्या, शैक्षणिक समस्या, अस्थिर वातावरणाने माणसे गोंधळली आहेत. बारीकसारीक स्वरूपाचे व्यवसाय बंद झाले, मन शांत करण्यासाठी मंदिरात जाणेदेखील शक्य नाही. या आजारामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाल्याने नव्याने समस्या वाढत आहेत.
माझे आर्थिक नियोजन करताना घोळ होतो, पैसे कमवत असून त्याचे सुख अनुभवता येत नाही, यासाठी काय करता येईल? माझा मुलगा हुशार आहे, पण अभ्यासापलीकडे फावला वेळ त्याने कसा काढावा, त्याच्याकडून काय करून घ्यावे ना त्याला कळत, ना आम्हा पालकांना कळत? मला मित्र-मैत्रीणी नाहीत मला माझ्या मनातील सांगावं अस कोणी नाही मी काय करू? असे अनेक प्रश्‍न समाजाला पडत आहेत. प्रत्येकाची समस्या लक्षात घेऊन त्यावर मार्ग काढण्याकरिता सौ. तेजा मुळ्ये समुपदेशन, मार्गदर्शन करत आहेत.
कोरोना काळामुळे मानसिक स्थिती ढासणे, कुटुंबातील समस्या समोर येत आहेत. मनाप्रमाणे नोकरी मिळाली पण अलीकडे कामात मन रमत नाही, नक्की काय चुकत कळत नाहीये अशी अवस्था होते. अशा वेळी या समस्येवर मात करण्यासाठी विचारांचे विविध पैलू लक्षात आणून देऊन, चर्चा करून ही समस्या सोडविण्यासाठी सौ. मुळ्ये काम करणार आहेत. असलेले विविध पर्याय लक्षात सांगून संबंधित व्यक्तीची समस्या सोडवून याचा मार्ग दाखवावा, असे मला सुचले.
यासंदर्भात सौ. मुळ्ये यांनी सांगितले, मी राहत्या घरी एक स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. तिथे मोकळेपणे व्यक्ती बोलू शकेल आणि समस्या निराकरण होईल. दररोज सायंकाळी 4 ते 7 या वेळात ओम सदन, 1/ 28, कुवारबाव रस्ता, रत्नागिरी येथे (मो. 8668741082) येथे समुपदेशन केले जाईल
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here