स्वस्त्यात सोने देण्याच्या बहाण्याने ५९ लाख लुटल्या प्रकऱणी खेड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला
खेड : स्वस्त्यात सोने देण्याच्या बहाण्याने महामार्गावरील उधळे येथील जंगलमय भागात बोलावून दुचाकीवरून आलेल्या आठजणांनी सोने खरेदी करण्यासाठी गेलेल्यांकडून ५९ लाख ६ हजार रुपये लुबाडले.ही घटना बुधवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती खेड पोलिसांनी. याप्रकरणी
किशोर पवार राहणार हरणे, सतीश चव्हाण व विक्रांत चव्हाण दस्तुरी खेड व अन्य सात ते आठ संशयितांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे
खेड तालुक्यातील वेरळ वासेवाडी येथे राहणाऱ्या अमर जड्याळ यांच्याकडे संपर्क साधून आरोपींनी दोन किलो सोने स्वस्त्यात देण्याचे सांगितले होते. त्यानुसार जड्याळ यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन ५९ लाख रुपयांची जुळणी केली. त्यानंतर अमर जड्याळ आणि त्याचे आणखी दोन मित्र एका सोनाराला घेऊन मारुती कार ने महामार्गावरील उधळे येथील कामाक्षी पेट्रोल पंपासमोरील जंगलमय भागात सोने खरेदी करण्यासाठी गेले. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास सोने विकण्यासाठी आठजण ठरलेल्या ठिकाणी आले. सोने खरेदी करण्याबाबत बोलणी सुरु असतानाच दुचाकीवरून आलेल्या आठजणांनी अमर जड्याळ व त्याच्या मित्रांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करण्यास सुरवात केली.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हे चारही जण घाबरून गेले. या चारहीजणांनी मोबाईल वरून कोणाशी संपर्क साधू नये यासाठी सर्वांचे मोबाईल हिसकावून घेत ते जंगलात फेकून दिले. त्यानंतर सोने खरेदी करण्यासाठी गेलेल्या चौघांकडे असलेली ५९ लाख ६ हजार रुपयांची रोकड घेऊन दरोडेखोर दुचाकीवरून पळून गेले.
अमर जड्याळ व त्याच्या सोबत गेलेल्यांनी जखमी अवस्थेत खेड पोलीस स्टेशन गाठून या बाबतची तक्रार दाखल केल्यानंतर खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी तात्काळ नाकबंदी केली होती उपलब्ध माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणी किशोर पवार राहणार हरणे ,सतीश चव्हाण व विक्रांत चव्हाण दस्तुरी खेड व अन्य सात ते आठ संशयितांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे
www.konkontoday.com