रत्नागिरीतील शहर बस सेवा सोमवारपासून सुरू होणार

0
122

१८ सप्टेंबरपासून राज्यातील एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. रत्नागिरीतील शहर बस सेवा (सिटी बस) सोमवारपासून (२१ सप्टेंबर) सुरू होणार आहे. रत्नागिरी विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
गेले अनेक दिवस शहर बस सेवा सुरू होणार असल्याचे बोलले जात होते; मात्र अखेर २१ सप्टेंबरपासून ही सेवा सुरळीत करण्याचा निर्णय महामंडळाच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे. आता शहर बससेवा वेळापत्रकाचे नियोजन करण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाईल; मात्र या बसेस टप्प्याटप्प्याने सोडल्या जाणार आहेत. पूर्वी दररोज ५० गाड्या सोडल्या जात होत्या. आता इतक्या गाड्या सोडण्यात येणार नाहीत; मात्र काही फेऱ्या प्रवासाच्या प्रतिसादानंतर सोडल्या जाणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here