अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एकाला अटक
खेड तालुक्यातील सोनगाव येथे घरात एकटी असणाऱ्या एक अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली
या प्रकरणी त्याच गावातील रोशन खेराडे या तरुणावर खेड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.संशयित रोशन खेराडे हा पीडित अल्पवयीन मुलीच्या वाडीत राहतो. तो विवाहित असून त्याची पत्नी गर्भवती आहे. मंगळवारी पीडित मुलगी ही घरात एकटी असताना त्याने हे कृत्य केले मुलीच्या पालकांनी पोलिस स्थानकात तक्रार केल्यावर त्याला पोलिसांनी अटक केली आहे
www.konkantoday.com