राज्यात शाळा सुरु करणे एवढ्यात तरी शक्य नाही— शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

0
44

केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावी पर्यंत शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे राज्यात शाळा सुरु करणे एवढ्यात तरी शक्य नसल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने याबाबत गाईडलाईन्सही जारी केल्या आहेत. मात्र शिक्षण विभागाने राज्यातील संस्था चालक तसेच शिक्षण तज्ज्ञ यांच्या समवेत चर्चा केली आणि त्यांची मतं जाणून घेतली. त्यात बहुतेक शिक्षक, संस्थाचालक यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातही आता कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे शाळा तुर्तास सुरू करण्यास हरकत घेतली आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here