सध्या आपल्या देशात जो खुळचट, बुळचट प्रकार सुरू आहे तो पाहता ऑलिम्पिकमध्ये ‘पोरखेळ’ प्रकारात एखादे सुवर्णपदक हमखास मिळेल”- सामना’च्या अग्रलेखातून टीका

0
34

मुंबईत माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याचे प्रकरण सध्या चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केले म्हणून शिवसैनिकांनी या अधिकाऱ्याला मारहाण केली. भाजपाने हा मुद्दा लावून धरताना सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. मदन शर्मा असे मारहाण झालेल्या या अधिकाऱ्याचे नाव आहे. शनिवारी या अधिकाऱ्याने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. ‘कायदा-सुव्यवस्थान संभाळणे जमत नसेल, तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी या अधिकाऱ्याने केली. त्यावर आज सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे.
“हे महाशय जी काही मागणी करतील ती करूद्यात, पण आपल्या सैनिकी पेशाला जागून त्यांनी 20 जवानांच्या हत्येस जबाबदार असलेल्या राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांच्याच राजीनाम्याची मागणी करायला हवी होती, पण सध्या आपल्या देशात जो खुळचट, बुळचट प्रकार सुरू आहे तो पाहता ऑलिम्पिकमध्ये ‘पोरखेळ’ प्रकारात एखादे सुवर्णपदक हमखास मिळेल” असे अग्रलेखात म्हटले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here