मातोश्री’ उडवून देण्याच्या धमकीचे फोन करणाऱ्याला कोलकात्यातून अटक
मातोश्री’ उडवून देण्याच्या धमकीचे फोन करणाऱ्याला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे.पलाश बोस असे आरोपीचे नाव आहे पलाश बोसने मातोश्रीसह गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचे फोन केले. राजकीय पक्षाशी संबंध नसल्याची माहिती एटीएसने दिली आहे. मातोश्री उडवून देण्याच्या धमकीचे फोन करणाऱ्याला कोलकात्याहून अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी ‘मातोश्री’ हे निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन गेल्या आठवड्यात मातोश्रीवर आला होता. त्यावेळी दाऊदचा हस्तक असल्याचा दावा फोन करणाऱ्यानं केला होता. तसंच हा फोन दुबईहून आल्याचा दावा केला जात होता
www.konkantoday.com