
दोन दिवसांच्याअधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात रत्नागिरीच्या आरोग्य सुविधा सुधारण्याच्या अपेक्षाना तिलांजली-ऍड.दीपक पटवर्धन
दोन दिवस चाललेलं अधिवेशन रत्नागिरी जिल्ह्याला वगळून होत असच वाटलं रत्नागिरी च्या आरोग्य यंत्रणेबाबत काही विषय उपस्थित होईल आरोग्य व्यवस्थे संदर्भातील विषय हायकोर्टात गेला मात्र विधिमंडळात हा विषय न येणे हे असंवेदनशीलते चा कळस होता अस माझं स्पष्ट मत आहे.मला मिळालेल्या माहिती प्रमाणे रत्नागिरी आरोग्य सुविधां संदर्भात कोणताही मुद्दा अधिवेशनात आला नाही हे शासनाला खंबीर पाठिंबा देणाऱ्या जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल.
रत्नागिरी जिल्ह्यात वाढते कोरोना रुग्ण, आरोग्य व्यवस्थेची कमतरता, डॉक्टर्स ची अपुरी संख्या ,अपुरा कर्मचारी वर्ग, रत्नागिरी वगळता अन्य ठिकाणी ऑक्सिजन बेड तसेच व्हेटिलेटर ची नसलेली उपलब्धता. सिव्हील सर्जन संदर्भात प्रलंबित असलेला विषय. असे अनेक गंभीर विषय होते.वाढीव मृत्युदर ही सर्व स्थिती अधिक गंभीर करत आहे.मात्र तरीही विधिमंडळात रत्नागिरी चे आरोग्य दुर्लक्षित राहील. अशी प्रतिक्रिया विधिमंडळ अधिवेशना वर बोलताना ऍड.दीपक पटवर्धन यांनी दिली.
लॉकडाउन आणि नंतर च्या कालावधीत अन्य ठिकाणाहून 3 लाखांच्या घरात अभ्यागत आले या संख्येचा अतिरिक्त भार इथल्या सुविधा , व्यवस्था या वर पडला. त्यात ग्रामपंचायतींचे 14 व्या वित्तायोगातून केंद्राने दिलेल्या निधीवर मिळालेलं व्याज राज्यसरकारने मागून घेतलं तेव्हा अस वाटलं पुरवणी अर्थसंकल्पात याची दाम दुपट्टीन परतफेड होईल मात्र असे होताना दिसत नाही.आंबा बागायतदार व्यावसायिक, शेतकरी, उद्योजक, मच्छिमार, काजू व्यावसायिक, व्यापारी वर्ग, रिक्षा व्यावसायिक, हॉटेल्स, लॉजिंग व्यावसायिक हे सर्व अडचणीत असताना विधिमंडळ अधिवेशना चे पुरवणी अर्थसंकल्पात काही भरीव योजना येईल ही अपेक्षा व्यर्थ ठरली. विधिमंडळ अधिवेशनात कोरोना विषाणूंच्या विळख्यात अडकलेल्या रत्नागिरीला जणू कोरनटाईन करून आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले होते.अशी बोचरी प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड.दिपक पटवर्धन यांनी दिली.
www.konkantoday.com