
देशातील पर्यटन व्यवसाय जगविण्यासाठी केंद्र सरकारने या व्यवसायाला मदतीचा हात द्यावा
कोरोना महामारीने देशातील पर्यटन व्यवसाय पार रसातळाला जाण्याच्या स्थितीत आहे
या व्यवसायातील टूर ऑपरेटर सध्या प्रचंड आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे देशातील पर्यटन व्यवसाय जगविण्यासाठी केंद्र सरकारने या व्यवसायाला मदतीचा हात द्यावा ,असे साकडे इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयएटीओ ) या औद्योगिक संघटनेने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाला घातले आहे.
सरकारने पर्यटन उद्योगाला मदतीचा हात दिला नाही तर आधीच दिवाळखोरीत निघण्याच्या वाटेवर असलेला हा व्यवसाय पार उध्वस्त होईल अशी भीती आयएटीओने केंद्र सरकारला पाठवलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com