
कोकण रेल्वे महामंडळाचे खासगीकरण करण्याचा घाट हाणून पाडणार-शौकतभाई मुकादम
केंद्र सरकारने काही विमानतळांचे खाजगीकरण सुरू केले असून त्याच पार्श्वभूमीवर कोट्यावधी रुपये फायद्यात असणार्या कोकण रेल्वे महामंडळाचे खासगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. यामुळे कोकणातील प्रकल्पग्रस्त व कोकणी माणसाला उध्वस्त करण्याचा हा डाव असून आम्ही तो हाणून पाडू असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे.
www.konkantoday.com