प्रतीक्षेनंतर आज पासून एमटीडीसीचे कोकणातील रिसॉर्ट सुरू होणार
अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टारंट आणि ईपासबाबत काही नियम शिथिल केल्यानंतर आता महाराष्ट्र पर्यटन मंडळानं देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आजपासून एमटीडीसीचे कोकणातील सर्व रिसॉर्ट आणि ह़ॉटेल्स सुरू करण्यात येणार आहेत. सध्या तरी किमान ३३ टक्के बुकिंग घेतली जाणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं ही बुकिंग होणार असून पर्यटकांना शासनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. . आता वेळणेश्वर, गणपतीपुळे, सिंधुदुर्गमधील कुणकेश्वर येथील हॉटेल्स सुरू केली जाणार आहेत. तर, कन्टेनमेंट झोनमधील पर्यटकाला मात्र यावेळी बंदी असणार आहे. शिवाय, ज्या ठिकाणी क्वॉरंटाईन सेंटरकरता या रिसॉर्ट आणि हॉटेलचा वापर केला गेला होता ती सर्व टप्प्याटप्प्यानं सुरू केली जाणार आहेत.
www.konkantoday.com