
केंद्रसरकारने प्रथमच मत्स्य व्यवसायासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले,रत्नागिरी जिल्ह्याचा 609 कोटी रुपयांचा आराखडा
केंद्रसरकारने प्रथमच मत्स्य व्यवसायासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले. त्या माध्यमातून मत्स्य उत्पादन वाढीसाठी मत्स्यसंपदा ही नवीन योजना सरकारने जाहीर केली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्याचा 609 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.मत्स्यसंपदा योजनेतून सागरी मासेमारी, गोड्या पाण्यातील मासेमारी आणि निमखार्या पाण्यातील मासेमारी वाढवण्याचा प्रयत्न आहे़. या योजनेतून दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी गाड्यांतून मासेविक्रीची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी सबसिडी ठेवण्यात आली असून त्यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मत्स्यसंपदा योजनेतून बंदरांचाही विकास होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील हर्णै आणि साखरीनाटे बंदरांचा समावेश करण्यात आला असून त्याकरीता सुमारे 150 कोटी रुपयांची तरतूद आराखड्यात करण्यात आल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले.
www.konkantoday.com