
महावितरणमार्फत किनारपट्टीवर भूमिगत वीजवाहिन्या,६०८ कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव
जून महिन्यातील निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरण कंपनीला बसला आहे. जिल्ह्याच्या समुद्रकिनारपट्टी भागात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी सुमारे ६०८ कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव महावितरणने राज्य शासनाकडे सादर केला आहे. यापूर्वी रत्नागिरी शहर परिसरासाठी मंजूर झालेल्या ९४ कोटी रुपयांच्या निधीतून नगरपालिका क्षेत्रात भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.
शासनाने महावितरणचा प्रस्ताव मंजूर केल्यास वादळी वार्यासह नैसर्गिक संकटाच्या कालावधीत देखील जिल्हावासीयांना अखंडीत वीज पुरवठा मिळणार आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत सुधारित प्रस्ताव महावितरणने शासनाकडे पाठविला आहे.
www.konkantoday.com