जेईई आणि नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी
जेईई आणि नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांसमोरील सर्वात मोठी अडचण दूर झाली असून प्रवासासाठी रेल्वेसेवा उपलब्ध असणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून परिपत्रक काढण्यात आलं आहे. विद्यार्थी विशेष उपनगरीय रेल्वेतून प्रवास करु शकतात असं या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासातील मोठा अडथळा दूर झाला असून मुंबई लोकलने प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहेदेशभरात १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे.
www.konkantoday.com