जीवाचा गोवा करण्यासाठी विमानाने ही तुम्ही गोव्यात येऊ शकता ,कोविड टेस्टची गरज नाही
जीवाचा गोवा करण्यासाठी विमानाने तुम्ही गोव्यात येण्याचा विचार करत असाल तर बॅग भरा आणि बिंदास्त यायला निघा कारण दाबोळी विमानतळावर उतरल्या नंतर तुम्हाला कोविड निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार ना स्वतःची कोविड टेस्ट करून घ्यावी लागणार आहे.
केंद्राच्या मार्गदर्शक तत्वां प्रमाणे गोवा सरकारने गोव्यात प्रवेशावरील सर्व निर्बंध हटवल्याने आता कोणीही गोव्यात येऊ शकणार आहे.गोव्यात पर्यटन व्यवसाय सुरु झाला आहे. यापूर्वीच हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. वाइन शॉप आणि रेस्टोरेन्ट देखील सुरु होती. आजपासून बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे पर्यटन व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
www.konkantoday.com