अनधिकृत उपसा न थांबल्यास हातपाटीवाल्यांचा उपोषणाचा इशारा
चिपळूण तालुक्यातील खाडीपट्ट्यात सक्शन पंपाद्वारे केला जाणारा अनधिकृत उपसा न थांबल्यास ७ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांना हातपाटी व्यावसायिकांनी दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून करंबवणे-केतकी वाशिष्ठी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडत आहे. तसेच खाडीपात्र खोल होत असल्याने हातपाटी वाळू उपसा करणे कठीण होणार आहे. हातपाटी व्यावसायिकांचा रोजगार बुडवून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे हे थांबले नाही तर ७ सप्टेंबरपासून चिपळूण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर ३० ते ३५ जणांच्या सह्या आहेत.
www.konkantoday.com