
ऊर्जा मंत्र्यांची ती घोषणा फसवी होती का? माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
लॉकडाऊनच्या काळातील भरमसाट वीजबिलातून नागरिकांना दिलासा देण्याची राज्य सरकारची घोषणा बारगळणार असं दिसतंय. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वित्त विभागाने त्याबद्दल अनुदान देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्र्यांची ती घोषणा फसवी होती का? असा सवाल माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.
कोरोनाच्या संकटात जनतेला मदत करण्यासाठी वेळ पडल्यास राज्य सरकारांनी कर्ज काढावे, अशी परवानगी आधीच केंद्र सरकारने देऊ केली आहे. मात्र, राज्यातील जनतेला दिलासा देण्याची इच्छा नसलेले राज्य सरकार त्याचाही फायदा करून घेत नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.
www.konkantoday.com