रत्नागिरीत आणखी एक खाजगी रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी साठी उपलब्ध,शिवश्री हाॅस्पिटलला कोविड DCHC साठी प्रशासनाची मान्यता
रत्नागिरीत आणखी एक खाजगी रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांच्या साठी उपलब्ध झाले आहे यामुळे कोरोना बाधित रुग्णांना दिलासा मिळणार आहे.शहरातील ग्रामीण पोलिस स्टेशन शेजारी, कारवांचीवाडी रोड येथील शिवश्री हाॅस्पिटलला कोविड DCHC साठी प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोविड पाॅझिटीव्ह आल्यावर शिवश्री हाॅस्पिटलला अॅडमिट होवून उपचार घेवू शकणार आहोत. DCHC मुळे याठिकाणी आॅक्सिजन ची मात्रा कमी झालेले रूग्ण सुध्दा उपचार घेवू शकणार आहेत. कोविडची सौम्य लक्षणे असणारे रूग्ण उपचार घेवू शकणार आहेत. शिवश्री रुग्णालयात जनरल वाॅर्ड, स्पेशल रूम्स, २४ तास डाॅक्टरांच्या निगराणीखाली, एमरजन्सी आॅक्सिजन ची सोय, फिवर क्लिनिक, एक्स-रे, रक्त तपासणीसाठी लॅब सुविधा उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी डाॅ. प्रतिक सुजित झिमण (9373871999) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com