दापोलीला कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी मिळावा, अनेक दिवसापासूनची दापोलीकरांची मागणी
दापोली तालुका आरोग्य अधिकारीपद गेले काही महिने फिरते झाले असून विविध आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्यांकडे याची जबाबदारी दिली जात आहे. त्यामुळे अनेक अडचणी व कामांचा ताण येऊ लागल्याने आरोग्य विभागाकडून बोलले जात आहे.
सध्या या आरोग्य अधिकारीपदाची जबाबदारी साखळोली आरोग्य केंद्राचे डॉ. जितेंद्र मेश्राम यांच्याकडे देण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून तीन ते चार आरोग्य अधिकारी बदलत आले आहेत एकीकडे कोरोनाचे संकट वाढत असताना दापोलीला कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी मिळावा अशी मागणी दापोलीकरांकडून होत आहे.
www.konkantoday.com