चिपळूण येथील होमगार्ड सुशांत आंब्रेंनी बसस्थानकात सापडलेले पैशाचे पाकीट मालकाला परत केले
कोरोना लढ्यात सक्रीय सहभाग घेत चिपळूण शहरातील शिवाजी नगर बस स्थानकावर सेवा बजावणारे कोविड योध्दे सुशांत सुभाष आंब्रे यांनी आपल्या कामातून प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे. आंब्रे हे बसस्थानकात ड्युटी करीत असताना त्यांना पैशाचे पाकीट मिळाले त्यामध्ये असलेल्या ओळखपत्राच्या आधारे त्यांनी संबंधितांचे संपर्क केला हे पाकीट मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांचे होते आंब्रे यांनी चाकरमान्याचे हरवलेले पैशांचे पाकीट खात्री करून घेऊन मालकाला सुपूर्द करत त्यांनी त्यातून माणुसकीचे दर्शन घडवले असून सर्वच स्तरातून त्यांचे कौतूक केले जात आहे.
www.konkantoday.com