ई-पासचे बंधन संपुष्टात आणण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी
आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची सक्ती मागे घ्यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत असली तरी मोहरम आणि गणेशोत्सवानंतरच ही सक्ती मागे घेण्यात येईल, असे सरकारच्या सूत्रांनी स्पष्ट केले. केंद्राच्या आदेशानंतरही राज्य सरकारने ई-पासची सक्ती कायम ठेवल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारवर टीका करताना, सरकारच्या धोरणात विसंगती असल्याचं म्हटलंय.
राज्य सरकारच्या धोरणांमध्ये गोंधळ आणि विसंगती दिसून येत आहे. केंद्र सरकारचे निर्णय इतर राज्यात लागू करण्यात आले आहेत.मात्र, महाराष्ट्रात ते लागू झालेले दिसत नाही, तो ट्रान्सपोर्टचा मुद्दा असेल किंवा इतर वेगळे निर्णय असतील. ई-पासच्या मुद्द्याचं औचित्यच आता संपलेलय, असे फडणवीस यांनी म्हटले. लोकं बसने प्रवास करू शकतात, तुम्ही पाहिलंच असेल आता देशाचा विषय संपलाय, तसा महाराष्ट्रातही विषय संपला पाहिजे, असे म्हणत ई-पासचे बंधन संपुष्टात आणण्याची मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे
www.konkantoday.com