लांजा तालुक्यात वेरवली येथे मृत्यू बिबट्याचे अवयव काढून बिबट्याला पुरले वनविभागाकडून चौकशी सुरू
लांजा तालुक्यातील वेरवली येथे वृद्ध झालेल्या बिबट्याचे अवयव काढून त्याला पुरण्यात आल्याचा प्रकार प्रकार उघड झाला आहे काही दिवसापूर्वी एका घरात बिबट्या आढळला होता वनविभागाला याची खबर दिल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता तेथे बिबट्या आढळला नाही मात्र त्यानंतर त्या घरात बिबट्या मृतावस्थेत सापडला होता काहीजणांनी या मृत बिबट्याचे अवयव काढून त्याला पुरल्याचे उघड झाले आहे या जुन्या घरातून वास येऊ लागल्याने वनविभागाला कळविण्यात आले तेव्हा हा प्रकार उघड झाला याबाबत वनविभागाने मृत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला बिबट्याचे नखे व पंजेकाढलेले आढळले आहे याबाबत संबंधितांची चौकशी वनविभागाकडून सुरू आहे याप्रकरणी काही जणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे
www.konkantoday.com