रत्नागिरी तालुक्यातील निवळी रत्नागिरी रोडवरील मासेबाव येथे राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी गावठी दारूचा मोठा साठा जप्त केला
राज्य उत्पादन शुल्क यांच्या पथकाने रत्नागिरी तालुक्यातील निवळी रत्नागिरी रोडवरील मासेबाव येथे गावठी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. रिक्षातून गावठी दारूची वाहतूक होत होती. उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनि केलेल्या कारवाईत 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी अडीच वाजता निवळी रत्नागिरी रोडवर मासेबाव येथे ही कारवाई करण्यात आली. गावठी दारूचे वाहतुक करणाऱ्या या रिक्षातून गावठी हातभटटी दारू असा एकूण 1 लाख 1 हजार 450 रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्काचे विभागिय उप आयुक्त श्री वाय.एम.पवार साहेब व रत्नागिरी जिल्हाचे अधिक्षक डॉ. बि.एच.तडवी साहेब यांचे मार्गदशानाखाली रत्नागिरी भरारी पथकाचे निरीक्षक शरद अंबाजी जाधव व जवान श्री विशाल विचारे, सागर पवार, निनाद सुर्वे यांनी केली.
www.konkantoday.com