
चाकरमान्यांचा एसटीला प्रतिसाद, चिपळुणात २० एसटी बसेसचे ग्रुप बुकींग
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी येथील चिपळूण आगार सज्ज झाले आहे. मुंबई, पुणेतील चाकरमान्यांसाठी येथील मध्यवर्ती बस स्थानकातून १०५ जादा एसटी बसेस फेर्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून आतापर्यंत तब्बल २० बसेसचे ग्रुप बुकींग झाल्याने व्यवस्थापनातर्फे समाधान व्यक्त केले जात आहे.
www.konkantoday.com