इतर जिल्हयाप्रमाणे सिमटोमॅटीक रुग्णाला Home isolation (गृह अलगीकरण) करण्याची परवानगी द्यावी- नगराध्यक्ष वैभव खेडेकर
सिमटोमॅटिक रूग्णांना घरी विलगिकरणात राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मनसे नेते व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केली आहे याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे खासगी रुग्णालयांना देखील कोव्हिड रुग्णांवर उपचाराची परवानगी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की
“कोरोनाचा कहर संपूर्ण देशामध्ये पर्यायाने महाराष्ट्रात, कोकणात, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. परंतू बाधित रुग्णाना उपचारासाठी सी.सी.सी.घरडा, कोव्हीड रुग्णालय कळंबणी किंवा सिव्हील रुग्णालय रत्नागिरी येथे भरती करावे लागते. शासकीय यंत्रणा प्रभावीपणे काम करीत असताना संपूर्ण जिल्ह्याचा ताण ह्या रुग्णालयांवरती येते. पर्यायाने उपचार अभावी रुग्णाचे हाल होतात किंवा मयत रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. रुग्णवाहिकांची देखील कमतरता भासत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन महानगराध्ये किंवा इतर जिल्हयाप्रमाणे सिमटोमॅटीक रुग्णाला Home isolation (गृह अलगीकरण) करण्याची परवानगी द्यावी. त्याप्रमाणे जिल्ह्यातील एम.डी.मेडीसिन डॉक्टरांना कोव्हीड रुग्णावर उपचार करण्याची परवानगी द्यावी. जेणे करुन शासकिय यंत्रणेवरचा भार कमी होऊन बाधित रुग्णाची संख्या कमी होईल. तरीही परवानगी रत्नागिरी जिल्ह्यातील डॉक्टरांना द्यावी ही विनंती त्याने या पत्रात केली आहे
www.konkantoday.com