अन्यथा १ सप्टेंबरपासून धान्य वितरण बंद, जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांचा इशारा
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशातच रेशन दुकानदारांना धान्य वितरित करताना पॉस मशिनवर ग्राहकांच्या अंगठ्याचे ठसे घेण्याच्या सूचना केल्या जात आहेत. मात्र यामुळे दुकानदारांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून शासनाने थेट पावतीद्वारे अथवा दुकानदारांच्या अंगठ्यांचे ठसे घेवून धान्य वितरित करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास १ सप्टेंबर पासून धान्य वितरण बंद करण्याचा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
www.konkantoday.com