
शिवतेज ओरोग्य सेवा संस्था खेड संचलित कोकणातील पहिल्या मुक्त विद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरु, इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे संस्थाचालकांचे आवाहन
खेड : शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित कोकणातील पहिल्या राष्ट्रिय मुक्त विद्यालयात थेट १० आणि १२ वी साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून गरीब, गरजू आणि प्रौढांसाठी अतिशय महत्वाच्या असणाऱ्या या मुक्तविद्दालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी संस्था कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन संस्था चालकांच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेली शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड ही संपुर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, अरोग्य विषयक विविध उपक्रम राबविले जातात. कोकणातील गरीब गरजू आणि प्रौढांनाही सहज शिक्षण घेता यावे या उद्दात्त हेतूने रामदास कदम यांनी ८ जुलै २०१६ रोजी यांनी संभाजी राजे छत्रपती सैनिकी स्कूल जामगे येथे या मुक्त विद्यालयाची स्थापना केली. ७ वी ८ वी किंवा नववी अनुत्तीर्ण झालेल्या १४ वर्षांवरील कुणालाही या मुक्तविद्यालयात थेट १० किंवा १२ वीसाठी प्रवेश घेता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे काही कारणांस्तव ज्यांना ९ वी पर्यंत शिक्षण घेऊन पुढे १० किंवा १२ वीचे शिक्षण घेता आलेले नाही. परंतू आता १० वी १२ पर्यंतचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे. त्यांना या मुक्त विद्यालयाच्या माध्यमातून आपली इच्छा पुर्ण करता येणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या माध्यमातून रामदास कदम यांनी एक सुवर्ण संधीच उपलब्ध करून दिली आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या तीन जिल्ह्यातील है एकमेव मुक्त विद्यालय असून अभ्यासकेंद्राचे मुख्य केद्र शिवतेज आरोग्य सेवा संस्था, खेड संचलित मातोश्री वुद्धाश्रम, आंबये, येथे सुरु आहे. या विद्यालयात १० वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी किमान वयोमर्यादा १४ ही असून यासाठी कमाल वयाची कोणतीही अट नाही. या विद्यालयाचा अभ्यासक्रम हा एनसीईआरटी मान्यता प्राप्त असून एनआयओएस बोर्ड हे सीबीएसई, आयसीएई प्रमाणेच एक राष्ट्रिय बोर्ड आहे. या विद्यालयातून १० उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला ११ वीसाठी कुठल्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. त्याच प्रमाणे १२ वी उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी कुठल्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येणार आहे. १२ वी करिता कला, वाणिज्य, व विज्ञान शाखा, निवडण्याचीही संधी असणार आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविली जात असून www.nios.gc.in या संकेतस्थळावर योग्य ती माहिती भरून आपला प्रवेश निश्चित करता येतो. प्रवेशाकरिता १५ संप्टेंबर २०२० ही अंतीम मुदत आहे. विद्यार्थ्याना एप्रिल/मे किवा ऑक्टोबर/नोव्हेंबर परिक्षेकरिताही फार्म भरता येतो. या प्रवेशासाठी शैक्षणिक अरह्हता-मान्यताप्राप्त शाळा, शिक्षण मंडळाचे निर्गमित केलेले किंवा स्वयंसांक्षांकित प्रमाणपत्र, वयाचा पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला, स्थानांतर प्रमाणपत्र, जन्मनोंदी प्रमाणपत्र या पैकी एक, आणि कायम पत्याचा पुरावा म्हणून रेशनकार्ड/मतदानकार्ड किंवा आधारकार्ड या कागपत्रांची आवश्यकता आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी प्राचार्य, छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल, जामगे, ता. खेड जिल्हा रत्नागिरी येथे 0२३५६-२९५५६२ किंवा मोबाईल क्रमांक ९४०५५९५२६७,९४०४२८३८१३ यांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com