केंद्र सरकारच्या सूचना बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ- गृह मंत्री अनिल देशमुख
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता केंद्र सरकारने देशभरात कुठेही सामान आणि प्रवाशी वाहतुकीसाठी ई पासची गरज लागणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहेकेंद्राने जाहीर केलेल्या अलीकडील मार्गदर्शक सूचनांची आम्ही दखल घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल,’ असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.
www.konkantoday.com