कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीयांनी जपली इको फ्रेंडली बाप्पाची परंपरा
रत्नागिरी येथील कुवारबाव येथील उत्कर्ष नगर वैभव सोसायटीत राहणारे संजय वर्तक आणि कुटुंबीयांनी गेली अनेक वर्षे इको फ्रेंडली गणपतीची परंपरा सुरू ठेवले आहे वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन त्याची देखाव्याचा द्वारे सादरीकरण केले जाते यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सामाजिक संदेश देत आपली इको फ्रेंडली गणपतीची व सामाजिक बांधिलकीची परंपरा चालू ठेवली आहे रत्नागिरीतील प्रसिद्ध मेकॅनिक व जिल्हा मेकॅनिक असोसिएशनचे पदाधिकारी संजय वर्तक यांनी या वर्षीदेखील इकोफ्रेंडली गणपतीची स्थापना केली असून यावर्षी त्यांनी कोरोना चा विषय घेतला आहे यामध्ये त्यांनी कोरोनाविषाणू चा नाश करणारा बाप्पा आणि त्याच्यासोबत भारतीय परंपरेत चे आयुर्वेदिक व इतर होमिओपॅथीचा वापर करून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून विषाणूंच्या संकटाचा पराभव कोरोना संकटाचा नाश करणारा संदेश या निमित्ताने देण्यात आला आहे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण पूर्वक अशी ही मूर्ती बनवण्यात आली असून ही मूर्ती सहा फुटाची असून त्यामध्ये पूर्णपणे पुट्टे, कागद ,गव्हाच्या पिठाची चिक्की यापासून बनवण्यात आली आहे होमिओपॅथिक गोळ्या दर्शवण्यासाठी साबुदाण्याचा ही वापर करण्यात आला आहे तर आयुर्वेदाचे महत्त्व दाखवण्यासाठी औषधी वनस्पती दर्शवल्या आहेत यामुळे हि मूर्ती सामाजिक संदेश तर देत आहेच याशिवाय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत वर्तक कुटुंब दरवर्षी असे सामाजिक संदेश या गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखाव्यातून देत असतात त्यांना अनेक स्पर्धांमधील पारितोषिकेही मिळाली आहेत
www.konkantoday.com