हातपाटीने वाळूचा उपसा करण्यासाठी आरक्षित असलेल्या गटाचे लिलाव एक सप्टेंबरपूर्वी होतील. अशी माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली. वाळू गटाचा लिलाव झाल्यानंतर बांधकामासाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध होईल त्याशिवाय तरूणांना यातून रोजगार उपलब्ध होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाळूचा स्वस्त दर निश्चित करण्यात यश मिळाल्याचे आमदार निकम यांनी सांगितले.
यावर्षी वाळू गटाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो तरूणांचा रोजगार ठप्प झाल होता
www.konkantoday.com