लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या प्लाझ्मा दानास भक्तांनी भरघोस प्रतिसाद दिला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘आरोग्योत्सव’ साजरा करण्याचे निश्चित केले होतेयाअंतर्गत मंडळाने आयोजित केलेल्या प्लाझ्मा दानास भक्तांनी भरघोस प्रतिसाद देत अवघ्या 14 दिवसांत 100 जणांनी प्लाझ्मादान केले आहे. येत्या 31 ऑगस्ट पर्यंत सुरु राहणाऱ्या या प्लाझ्मादान शिबीरात येत्या काळात आणखीन रुग्णांनी पुढे यावे, असे आवाहन मंडळाकडून यानिमित्ताने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com