समर्थ रंगभूमीचा प्र.ल. माहितीपट दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर,ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकरांच्या स्मृतिदीनी १८ ऑगस्टला प्रसारण

0
60

रत्नागिरी दि.१४ प्रतिनिधी
अग्निपंख,दीपस्तंभ ,रातराणी,गंध निशिगंधाचा,डॅडी आय लव तू,सारखी दर्जेदार नाटकं…जंगल्याच्या भाषेची निर्मिती करणारे अथ मनुस जगन हं…पोट धरून हसायला लावणारे पांडगो इलो रे बा इलो…अंगावर राष्ट्रभक्तीचा रोमांच उमटवणारे तक्षकयाग सारख्या मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या नाटकांच्या इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे.ज्येष्ठ नाटककार प्र.ल.मयेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दि.१८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता समर्थ रंगभूमी निर्मित “प्र.ल” हा २५ मिनिटांचा माहितीपट प्रसारित करण्यात येणार आहे.
कै.प्र.ल.मयेकर यांच्या नाट्यविषयक कारकिर्दीचा इतिहास सांगणार हा माहितीपट आहे.प्र.ल.मयेकरांनी लिहिलेल्या एकांकिका,नाटक,चित्रपट,मालिका आणि कथासंग्रहाच्या इतिहासाबरोबर त्यांच्या सोबत काम केलेले अनेक दिग्गज मंडळीनी सांगितलेले अनुभव,आठवणीनी हा माहितीपट अधिकच दर्जेदार ठरलाय.प्र.ल.माहितीपटाची संकल्पना आणि लेखन दुर्गेश आखाडे यांची आहे.निवेदन अभिनेता अविनाश नारकर,प्रमोद पवार आणि अभिनेत्री मयुरा जोशी यांनी केले आहे.छायाचित्रण अजय बाष्टे यांचे असून संकलन धीरज पार्सेकर यांनी केले आहे.ध्वनीमुद्रण उदयराज सावंत यांच्या एस.कुमार स्टुडिओत करण्यात आले आहे. दिग्दर्शन श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांनी केले आहे.देवीलाल इंगळे यांचे निर्मिती सहाय्य लाभले आहे.समर्थ रंगभूमीची निर्मिती असलेला प्र.ल. माहितीपट दूरदर्शनवर प्रसारीत करण्यासाठी प्रसारमाध्यम तज्ञ जयू भाटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.निर्माते कुमार सोहनी,प्रसाद कांबळी,पद्मश्री मोहन वाघ,अभिनेते अरूण नलावडे,संजय मोने,चिन्मय मांडलेकर,अभिनेत्री एेश्वर्या नारकर,शीतल शुक्ल,माधवी जुवेकर,तंत्रज्ञ कै.अविनाश बोरकर,कै.प्र.ल.मयेकरांची सुकन्या विशाखा मयेकर-सहस्त्रबुध्दे,डॉ.रवी बापट आणि रंगकर्मी श्रीकांत पाटील यांनी त्यांच्या आठवणीतू न रंगभूमीवरच्या इतिहासला आपल्यासमोर मांडला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here