वीजबिले माफ करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रातांधिकारी यांना निवेदन

0
34

खेड : कोरोनामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून गेली असतानाच बीजग्राहकांना वाढीव बिले देण्यात आली आहेत. कर्जवसूलीसाठीही तगादा लावला जात असल्याने सर्वसामान्यांना जगणे असह्य झाले आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात वीजबीले माफ करावीत तसेच कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये असे आदेश शासनाने द्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खेडचे प्रातांधिकारी अविशकुमार सोनोने यांना देण्यात आले आहे.
प्रातांधिकारी यांना दिलेल्या निवेदनात अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने महामार्ग चौपदरीकरणामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादीत करण्यात आली त्यापैकी काही शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही त्यांना तात्काळ मोबदला दिला जावा, ज्या
शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला देवून त्यांची क्रूर चेष्टा करण्यात आली आहे त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जावा, चौपदरीकरणामध्ये काही जणांच्या राहत्या घरांवर हातोड पडला आहे. मात्र त्यांनाही घराचा योग्य मोबदला मिळालेला नाही. तो मोबदला वेळेत आणि योग्य प्रमाणात देण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
कोरोनामुळे सारे व्यवहार ठप्प झाले आहेत. बँकाचे कर्ज घेऊन सुरु करण्यात आलेले व्यवसाय बंद ठेवावे लागत असल्याने व्यवसायिक आर्थिक अडचणीत आहेत. मात्र बँका कर्जवसुलीसाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बँकानी कर्जवसूलीसाठी तगादा लावू नये असे आदेश शासनाने द्यावेत असेही निवेदनात सुचीत करण्यात आले आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार संजय कदम, तालुका अध्यक्ष स तू कदम तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here