परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे कोव्हिड केअर सेंटरचे उद्धाटन

खेड : गेल्या काही दिवसांमध्ये खेड तालुक्यात कोरोनाबाधीतांची वाढ़ती संख्या लक्षात घेत तालुक्यातील घाणेखुंट येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे दुसरे कोव्हीड केयर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरचे उदघाटन खेडचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या काही दिवसात खेड तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनाबाधीतांवर उपचार करण्यासाठी लवेल येथील घरडा कोव्हिड केयर सेंटर आधीपासूनच सुरु करण्यात आले असून या केअर सेंटरची क्षमता १०० बेड इतकी आहे. तर कोव्हीड हॉस्पिटल असलेल्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाची मर्यादा ५० बेडची असून सद्यस्थितीत केवळ ३० बेड कार्यान्वित करण्यात आले आहेत.
घरडा कोव्हिड केअर सेंटरमध्ये सस्पेक्टेड आणि अनसीमटेमेटिक कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण दाखल आहेत. तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात सिमटेमेटिक म्हणजेच लक्षणे असलेली कोरोनाग्रस्थ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनामुळे जे रुग्ण गंभीर झालेले आहेत त्यांना रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येते.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत या उद्धेशाने आणखी एका कोव्हिड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. ३० बेड असलेल्या या रुग्णालयात शासनाने निर्गमित केलेल्या दरांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
उद्घाटनाप्रसंगी खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील , पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संभाजी गरुड तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button