चिपळूण कामथे रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आत्महत्या
चिपळूण-कामथे रुग्णालयात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने काल रात्री साडेबाराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ६ ऑगस्ट रोजी या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हा रुग्ण खेड तालुक्यातील आंबडस येथील आहे. रात्री हॉस्पिटलच्या बेडवरील चादरीने लोखंडी गजाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालयाचे डॉ. मारुती म्हात्रे यांनी याबाबतची खबर पोलिसांना दिली आहे.
www.konkantoday.com