आरजीपीपीएल विरोधात प्रकल्पग्र्रस्तांचे स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण

0
97

गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल कंपनीत गेली १० वर्षे पाठपुरावा करूनही नोकरी मिळत नसल्याने येथील प्रकल्पग्रस्त निलेश धामणस्कर यांनी आपल्या कुटुंबासमवेत १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आरजीपीपीएल मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.
बहुचर्चित दाभोळ पॉवर प्रकल्पाच्या उभारणीत अंजनवेल, वेलदूर, रानवी गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्यांना मोबदल्यासह प्रकल्पग्रस्त म्हणून कंपनीत नोकरीत सामावून घेतले जाण्याची हमी देण्यात आली होती.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here