गणेशोत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी राजापूर तालुक्यात १२ तपासणी केंद्रे
गणेशोत्सवासाठी राजापूर तालुक्यात येणार्या चाकरमान्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी एकूण १२ ठिकाणी तपासणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये ९ प्राथमिक आरोग्य केंद्र राजापूर ग्रामीण रूग्णालय तसेच सागवे कात्रादेवी शाळा व जैतापूर हायस्कूल या ठिकाणांचा समावेश आहे.
आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत तहसिलदार प्रतिभा वराळे यांच्या दालनात याबाबतच्या आढाव्याची बैठक नुकतीच संपन्न झाली.
www.konkantoday.com