नव्या कोव्हिडं रुग्णालयाच्या लोकार्पण निमित्ताने सर्व संबंधितां ना धन्यवाद ;-दीपक पटवर्धन
रत्नागिरी जिल्हा भाजपा नव्या कोव्हिडं रुग्णालयाचे लोकार्पण होऊन रुग्णालय रुग्णसेवेसाठी उपलब्ध झाल्या बद्दल समाधान व्यक्त करत असून शासकीय यंत्रणेला धन्यवाद देत आहे. असे भाजपा रत्नागिरी दक्षिण अध्यक्ष दीपक पटवर्धन म्हणाले.
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अतिरिक्त रुग्णालयाची नितांत आवश्यकता होती. जिल्हारुग्णालयावर अतिरिक्त ताण येत होता.रुग्ण सेवेवर अनिष्ट परिणाम दिसू लागला होता.जिल्हारुग्णालयातील डॉकटर्स आणि अन्य कर्मचारी अथक सेवा देत आहेत. मात्र वाढती रुग्ण संख्या पाहता आणखी व्यवस्था आवश्यक होती. नवे रुग्णालय रुग्णसेवेसाठी उपलब्ध झाल्याने वैदयकीय सुविधांची प्रत सुधारेल अशी अपेक्षा करूया.
मा.पालकमंत्री महोदय मा.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महोदय ,मा जिल्हाधिकारी अन्य सर्व संबंधित अधिकारी त्यांची सर्व डिपार्टमेंट या सर्वांना भाजपा रत्नागिरी धन्यवाद देत आहे.
15 ऑगस्ट रोजी अतिरिक्त डॉक्टर्स तसेच परिचारिका सफाई कर्मचारी यांची नियुक्ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी निर्णय व्हावेत .आवश्यक औषधें, इंजेक्शन, तसेच व्हेंटिलेटर ची प्रत, ऑक्सिजन पुरवठा सुविधा जिल्हारुग्णालयात ही पर्याप्त स्वरूपात निर्माण व्हाव्यात अशी मागणी करत असल्याचे पटवर्धन म्हणाले.
नव्या रुग्णालयात उत्तम वैद्यकीय सेवा सुविधा रुग्णांना पुरवल्या जाव्यात अशी व्यवस्था होईल याकडे सर्व संबंधितांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com