अखेर गुहागरच्या समुद्र किनार्यावरील समुद्र दर्शिनी(सी-व्ह्यू गॅलरी) आज शनिवारी पाडण्यात येणार
अखेर गुहागरच्या समुद्र किनार्यावरील समुद्रदर्शिनी(सी-व्ह्यू गॅलरी) शनिवारी पाडण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार यांच्या उपस्थित ही कार्यवाही होणार आहे.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, प्रचंड मेहनत घेऊन हे कौतुकास्पद काम दुसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून करण्यात जे यशस्वी झाले त्यांचे व आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्यांनी हे कृत्य करण्यामध्ये आपला खांदा पुढे केला, त्यांचे या उत्तुंग कामगिरीबद्दल मी अभिनंदन करतो.
गुहागरच्या समुद्रकिनार्यावर सीआरझेडची परवानगी न घेता प्रशासनाने बांधलेल्या जेटी आणि समुद्रदर्शिनी (सी-व्ह्यू गॅलरी) तोडण्याचे आदेश हरित लवादाच्या पश्चिम क्षेत्रपीठाने मार्च 2020 मध्ये दिले होते.
www.konkantoday.com